काय सांगता ! होय, केरळमधील घरं बनली पब, अचानकपणे नळातून येऊ लागली ‘दारू’, पाहून सर्वच जण ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळची काही घर रात्रीनंतर पब मध्ये बदलतात. येथे राहणाऱ्यांनी आपल्या घरातील नळ सुरु केले तर त्यातून दारु बाहेर येते. त्रिशुर जिल्ह्यातील सोलोमन एवेन्यू फ्लॅट्समध्ये राहणारे हे लोक आहेत. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने जेव्हा रात्री आपल्या घराचे नळ सुरु केले तेव्हा त्यातून दारु बाहेर आली. शेजारच्यांना विचारल्यावर कळाले की एकूण 18 घरांमधील नळातून दारू येत आहे.

लोकांनी भरली दारु –
ही दारु लोकांनी जमा केली. रहिवाशांनी ही माहिती एक्साइज डिपार्टमेंटला दिली. त्यानंतर डिपार्टमेंटकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला. एक वृत्तानुसार एक्साइज डिपार्टमेंटने सांगितले की हे सर्व 6 वर्षांपूर्वी रचना नावाच्या बार पासून सुरु झाले होते. या बारमध्ये अवैधपणे 6 हजार लीटर दारू साठवून ठेवली गेली होती. हा बार सोलोमन एवेन्यूच्या परिसरात आहे. ही माहिती जेव्हा डिपार्टमेंटला मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाच्या ऑर्डर नुसार नष्ट करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे.

दारु नष्ट करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक मोठा खड्डा करुन त्यात दारू टाकून नष्ट केली. ही दारू नष्ट होण्याऐवजी जमिनीत पाण्यात मिसळली आणि त्यानंतर नळाद्वारे लोकांच्या घरापर्यंत पोहचली. अधिकाऱ्यांना याची कल्पना नव्हती की बारच्या परिसरात सोलोमन एवेन्यू आहे. रहिवाशांनी या घटनेनंतर आबकरी अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी चालकुडी नगरपालिका सचिव आणि आरोग्य विभागाचे दरवाजे ठोठावले आहेत.