हैद्राबाद रेप केस ! डॉक्टर महिलेच्या मृतदेहाच्या DNA अहवालात मोठा खुलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद बलात्कारामुळे सर्व देश हळहळ व्यक्त करत होता आणि यातच पोलिसांकडून सर्व आरोपींचा इन्काऊंटर झाल्यानंतर संपूर्ण देशाने हैद्राबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला होता आता या प्रकरणातील महिला डॉक्टरच्या जळालेल्या मृतदेहाचा डीएनए रिपोर्ट समोर आला आहे. डीएनए रिपोर्ट नुसार मृत महिलेचा आणि कुटुंबीयांचा एकच डीएनए असल्याचे समोर आले आहे.

काय आहे DNA रिपोर्टमध्ये
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार डीएनए अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, जळालेली बॉडी ही डॉक्टर महिलेचीच आहे. डीएनए अहवालात असेही सांगितले गेले आहे की घटनेच्या ठिकाणी सापडलेले सेमिनल डाग चार आरोपींचे होते. महिला डॉक्टरांच्या शरीरातील हाडे डीएनए चाचणीसाठी पाठविली गेली होती याशिवाय पीडित मुलीच्या कपड्यांमधून अंतिम नमुने घेण्यात आले होते. तसेचअसे म्हटले जात आहे की तपास अधिकारी आणखी काही अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

काय झाले होते त्या रात्री
हैद्राबादमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता त्यानंतर हा मृतदेह महिला डॉक्टरचा असून तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तात्काळ चार आरोपीना ताब्यात घेतले होते. संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले होते.

कसा झाला होता इन्काऊंटर
आरोपींना त्याच ठिकाणी नेण्यात आलं , ज्या ठिकाणी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस जखमी झाले होते. त्यामुळेच पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात चारही आरोपी ठार झाले. अशी अधिकृत माहिती शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिली होती.

चौकशीचीचे दिले होते आदेश
पोलिसांनी चारही आरोपींचा इन्काउंटरमध्ये ठार केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तीन सदस्य समितीला अधिक तपास करण्यास सांगितले होते. याच्या प्रमुख पदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वीएस सिरपुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालदोता आणि माजी सीबीआय डायरेक्टर कार्तिकेन हे देखील असतील. तसेच या आयोगाला आपला निकाल सहा महिन्यात द्यावा लागणार आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/