हैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे आरोपी अद्यापही रूग्णालयात पडूनच, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला डॉक्टरवर अत्याचार करत चार आरोपींनी महिलेला जिवंत जाळले होते देशभर या घटनेने हळहळ व्यक्त केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र तपासादरम्यान आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांकडून चारही आरोपी ठार झाले होते. या घटनेला दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही अद्याप अजून आरोपींच्या नातेवाईकांना त्यांचे मृतदेह देण्यात आलेले नाहीत.

का दिले जात नाहीये मृतदेह ?
6 डिसेंबर रोजी चारही आरोपींचा पोलिसांनी इन्काऊंटर केला मात्र त्यानंतर अनेकांनी याबाबत संशय व्यक्त केल्यामुळे न्यायालयाने चौकशी करण्यासाठी एका त्रीसदस्य समितीची स्थापना केली. यावेळी अधिक तपासासाठी न्यायालयाने 13 डिसेंबर पर्यंत चारही आरोपींचे मृतदेह संरक्षित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील न्यायालयाने शेवटचा निर्णय येईपर्यंत मृतदेह जपून ठेवण्याचे आदेश दिले होते.

मृतदेहाची तपासणी सुरू
विशेष सदस्य समिती इन्काउंटर केलेल्या आरोपींच्या मृतदेहाची तपासणी करत आहे. समिती याबाबत तपास करत आहे की, पोलिसांनी प्रती हल्ल्यामध्ये आरोपीना गोळ्या मारल्या की जाणून बुजून गोळ्या मारल्या.

असा झाला होता इन्काऊंटर
आरोपींना त्याच ठिकाणी नेण्यात आलं , ज्या ठिकाणी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस जखमी झाले होते. त्यामुळेच पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात चारही आरोपी ठार झाले. अशी अधिकृत माहिती शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/