काश्मीरी मुलींसोबत विवाह करण्यासाठी देशातील युवक ‘उताविळ’, Google वर चालु आहे ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडीयावर “मॅरी कश्मिरी गर्ल” आणि “हाऊ कॅन आय मॅरी अ कश्मिरी गर्ल” सर्च करण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून कश्मिरी मुलींशी लग्न करण्यासाठी गुगलवर फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

मॅरी कश्मिरी गर्ल सर्च करण्यात सर्वात पहिला क्रमांक पश्चिम बंगाल, दुसरा क्रमांक दिल्ली, तिसऱ्या क्रमांकावर तेलंगाना, चौथ्या क्रमांकावर कर्नाटक तर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यानंतर कश्मिरी गर्ल सर्च करण्यात केरळ पहिल्या, झारखंड दुसऱ्या तर हिमाचल प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. सहा ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये मॅरी कश्मिरी गर्ल सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर देशातील नागरिकांना आता कश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार आहे.

त्यामुळे कश्मिरमध्ये जमीन खरेदीसाठी झारखंडमध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर दिल्ली त्याखालोखाल हरियाणा राज्यात कश्मिरमध्ये जमीन खरेदीवर सर्च करण्यात आले आहे.
मागील सात दिवसात पश्चिम बंगालमध्ये कश्मिरी मुलींची छायाचित्रे सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आली आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक वेळा कश्मिरी मुलींच्या छायाचित्रे पाहण्यासाठी सर्च करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त