‘चांद्रयान-2’ : विक्रम ‘लँडर’शी संपर्क साधण्यासाठी NASA इस्रोच्या मदतीला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे चांद्रयान-2 मिशन अद्याप संपलेले नाही. इस्रोच्या वैज्ञानिकांनी विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. या मोहिमेमध्ये जगातील सर्वात मोठी अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) देखील सहभागी झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार नासादेखील विक्रम लँडरला संदेश पाठवत आहे. परंतु आतापर्यंत हा संवाद अद्यापही एकतर्फी होत आहे. विक्रम लँडरकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

नासा संदेश पाठवत आहे –

नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने (NASA/JPL) लॅंडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली आहे. डीप स्पेस नेटवर्क (DSN) च्या माध्यमातून नासा हे संदेश पाठवत आहेत. अमेरिकन अंतराळवीर स्कॉट टिले यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्याने सिग्नल रेकॉर्ड करून ट्विटरवरही शेअर केला आहे. नासाने कॅलिफोर्नियास्थित DSN वरून लॅंडर विक्रमला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठविली आहेत.

नासाने केले होते कौतुक –

नासाने नुकतीच भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान-2 अभियानाचे कौतुक केले होते. नासाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले होते की अंतराळात संशोधन करणे एक कठीण काम आहे. चांद्रयान-2 मिशनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो.

मिशनमध्ये येणाऱ्या अडचणी –

इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क सहा दिवसांपूर्वी तुटला. काही दिवसांपूर्वीच चंद्राभोवती परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचे फोटो पाठवले. त्यामुळे विक्रमच्या ठावठिकाणाची माहिती इस्रोला मिळाली. मात्र अद्याप शास्त्रज्ञांना विक्रमशी संपर्क साधण्यात यश मिळाले नाही. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकांना अवघ्या 9 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 21 सप्टेंबर पर्यंत ते लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात. यानंतर, चंद्रावर लूनर नाइट सुरू होईल. त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलेल. विक्रमला केवळ 14 दिवस सूर्यप्रकाश मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –