जतमध्ये पिस्तुल जप्त, तिघांना घेतले ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तिघांना जत परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलसह एक जिवंत काडतूस असा ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास प्रकाश बंडगर (२२, इरळी, सध्या बाज, जत), इरफान उर्फ विरूपाक्ष रमेश दुगाणे (२४, रा. बाज) व संगाप्पा उर्फ संगशेट्टी रेवनाप्पा मिरगुणे (४३, दाडगी, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B01IK52REI,B0083TXWXC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c404dfb1-ad9b-11e8-b232-71ac00b1c563′]

विकास बंडगर, इरफान उर्फ विरूपाक्ष दुगाणे व संगाप्पा उर्फ संगशेट्टी मिरगुणे हे तिघेही मित्र असून ते जत परिसरातील सांगोला रस्त्याजवळ असलेल्या सोनलकर चौकात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचला. यावेळी तिघेही फिरतांना अढळून आले. तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून इंग्लंड मेड असा उल्लेख असलेली एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, अशोक डगळे, निलेश कदम, नारायण डवरे, मच्छिंद्र बर्डे, संतोष असवले, अनिल कोळेकर यांनी कारवाई केली.

सहा महिन्यानंतर घरफोडीतील आरोपी जेरबंद; १.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त