सुशांतच्या मृत्यूचा बॉलिवडूला असाही फटका, विराट-धोनीनं मारली बाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुलै ते ऑगस्ट काळात सेलिब्रिटींना मिळणाऱ्या जाहीरातींचा विचार केल्यास बॉलिवूडमधील स्टार लोकांपेक्षा क्रीडा क्षेत्रातील लोकांना याचा अधिक फायदा झाला आहे. क्रीडा क्षेत्रातील लोकांना बॉलिवूडमधील स्टार लोकांपेक्षा अधीक जाहीराती मिळाल्या आहेत. मागील दोन महिन्यामध्ये चित्रपटातील स्टार्सना कमी जाहीराती मिळाल्या आहेत. तर जाहिराती मिळवण्यात खेळाडूंनी बाजी मारली आहे. अनेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगमुळे जाहिराती बंद केल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वादामुळे बॉलिवूडमधील स्टार लोकांना जाहीराती मिळालेल्या नाहीत. याचा फायदा खेळाडूंना झाला असून त्यांच्यापूढे स्टार टिकले नाहीत. महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा जाहीरात क्षेत्रात प्रवेश केला आहे. क्रिकेटपटूंना जाहिरातीमध्ये संधी मिळत असताना बॉलिवूडमधील वादामुळे स्टार लोकं मागे पडल्याचे पहायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर सध्या ज्या गोष्टी घडत आहेत. याचा फटका बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना बसत आहे.

महेंद्र सिंह धोनी याने मागील महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्षाच्या आधारावर गेल्या दोन महिन्यात क्रिकेटपटूंच्या जाहिराती 17 टक्क्यांनी वाढल्याचे TAM AdEx ने म्हटले आहे. एका अहवालानुसार सर्वाधिक जाहिराती विराट कोहलीला मिळाल्या असून त्याच्या नंतर महेंद्र सिंह धोनी, सचिन, सौरभ गांगुली आणि विरेंद्र सेहवागचा नंबर लागतो.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटिंच्या बाबतीत बोलायचे झाले तर वर्षाच्या आधारावर त्यांच्या जाहिराती 30 टक्क्यांनी घटल्या आहेत. यामागे सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, चीन विरोधातील लोकांची राग इत्यादी गोष्टी असल्याचे बोलले जात आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोहली अव्वल स्थानी होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धोनी दुसऱ्या तर अमिताभ बच्चन आणि करिना कपूर हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.