भाजपामध्ये आगामी 15 दिवसांत ‘यांना’ मिळणार मोठी जबाबदारी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काही निवडणुकांमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये येत्या जुलै महिन्यात मोठे संघटनात्मक बदल होईल अशी माहिती मिळते आहे. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले असून नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांची स्वतंत्र नवीन कार्यकारिणी निवडली जात आहे.

नवीन कार्यकारणीमध्ये भारतीय जनता पक्षाला मधल्या काही नाराज नेत्यांना स्थान देऊन, मोठी जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. तिथल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कुलकर्णी यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यातही कुलकर्णी यांना पक्षांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता मात्र त्यांना नव्या कार्यकारणी मध्ये मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील महामंत्री म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे आशीष शेलार यांचादेखील महामंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे . भाजपच्या नाशिकचा आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आता भाजपचे इतर नाराज नेते पंकजा मुंडे, विनोद तावडे किंवा एकनाथ खडसे यांच्याकडे पक्ष काही जबाबदारी देणार आहे का हे पाहावे लागेल. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे गेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार मध्ये असलेले मंत्री राम शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता ही नवी कार्यकारिणी या सर्व व नेत्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.