कल्याणमध्ये भरदिवसा महिलेवर सपासप वार करून खून

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी एका तासात अटक केली आहे.

सनम करोटीया असे खून झालेल्या महिलेचे नाव असून बाबू धकनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बाबूने कोणत्या कारणामुळे हे कृत्य केले हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या एका तासात गजाआड करण्यात आले.

सनम करोटिया ही आपल्या दुचाकीवरून एपीएमसी मार्केटच्या आवारात मित्रांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सनम उभी असलेल्या ठिकाणी दुचाकी उभी केली. त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाले. त्यात एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सनम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सनम यांच्या गाडीच्य डीकीत असलेल्या मोबाईल फोन वरून आरोपीचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी एका तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी आणि सनम हे एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत असल्याचे प्राथमीक तपसात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत