Video : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात जास्त फ्लर्ट, जया प्रदांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada), अभिनेता राज बब्बर (Raj Babbar), अभिनेता गुरप्रीत गुग्गी (Gurpreet Ghuggi) यांनी अलीकडेच द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. यावेळी सर्वांनीच खुलून गप्पा मारल्या. जया प्रदा यांनीही यावेळी एक खुलासा केला.

सोनी टीव्हीनं कपिल शर्मा शोच्या आगामी भागाचा प्रोमो इंस्टावरून शेअर केला आहे. यात जया प्रदा आणि राज बब्बर हे त्यांच्या काळातील अनेक गप्पा गोष्टी सांगताना दिसत आहेत. कपिलही त्यांना काही मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे.

कपिलनं जया प्रदा यांना एक प्रश्न विचारला की, सिनेमाच्या सेटवर कोणता अभिनेता सर्वात जास्त फ्लर्ट करायचा. यावेळी लगेच उत्तर न देता आधी जया प्रदा यांनी राज बब्बर यांना विचारलं की, सांगू का. त्यावेळी ते हो म्हणताच जया प्रदा यांनी सांगितलं की, धर्मेंद्रजी. जया यांनी धर्मेंद्र यांचं नाव घेताच प्रेक्षक हसू लागले.

धर्मेंद्र आणि जया यांची जोडी 80 आणि 90 च्या दशकात सगळ्यात लोकप्रिय जोडींपैकी एक होती. या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. कयामत, इंसाफ कौन करेगा, गंगा तेरे देश में आणि कुंदन अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.

जया आणि राज बब्बर यांचा हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.