केंदूरमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवत विनयभंग

शिक्रापूर  : प्रतिनिधी  –  शिरुर तालुक्यातील केंदूर येथील महिला घरामध्ये असताना एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत, महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबतीत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतीत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार केंदूर ता. शिरूर येथील सदर महिला तिच्या घरामध्ये असताना गावातील संदीप पवार हा इसम हातामध्ये चाकू घेऊन आला, महिलेला अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ, करू लागला यावेळी महिला त्याला समजावून सांगत असताना त्याने महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले त्यामुळे महिलेने आरडाओरडा केला असता महिलेची मुलगी घरात आल्याने त्याने महिलेला सोडले, त्यांनतर सदर महिला व तिच्या मुलीने गावातील पोलीस पाटलांना याबाबत माहिती देत पोलीस स्टेशन गाठले, याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदीप पांडुरंग पवार रा. केंदूर ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like