खंडोबाच्या जेजुरीत भाजपा कार्यकर्त्यांनी घातला सरकार विरोधात जागरण गोंधळ

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – बंद मंदिरे उघडा अन्यथा कायदाचा भंग करीत मंदिरे उघडली जातील भाजपाचा राज्य सरकारला इशारा, तर बंद केली मंदिरे उघडले गेले बार उद्धवा अजब तुजे सरकार असा नारा देत भरला तळी भंडारा.

राज्यातील मंदिरे बंद असल्याने सर्वसामान्य लोकांची उपासमार होत असल्या कारणाने शासनाच्या या गळाचेप धोरण विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क खंडोबाच्या जेजुरीत सरकार विरोधात जागरण गोंधळ घालत शंख नाद हि केला बंद झाली मंदिरे उघडले गेले बार उद्धवा अजब तुझे सरकार अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भाजपा जिल्हाअध्यक्ष तात्या भेगडे, पुरंदर तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप, जिल्हा भाजपा नेते जालिंदर कामथे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सागर भूमकर, मैनाताई जाधव साकेत जगताप सचिन पेशवे, गणेश भोसले, सुनिता कसबे, अलका शिंदे, अँड सरला तिवारी आदि मान्यवरांनी शासना विरोधात तळी भंडारा करीत भंडारा हि उधळला.

राज्य शासनाने केवळ स्व:ताचा स्वार्थ पहिला असून सर्व सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ खंडोबा केला असल्याचा आरोप तात्या भेगडे यांनी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली.शासनाने मंदिरे उघडली नाहीतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात कायद्याचे उल्लंघन करीत सर्व मंदिरे उघडतील असा ईशारा हि उद्धव सरकारला तात्या भेगडे, निलेश जगताप, राहुल शेवाळे आणि जालिंदरभाऊ कामथे यांनी यावेळी दिला आहे या आंदोलनात खंडोबा देवाचे मानकरी असलेल्या वाघ्या- मुरळी यांनी सहभाग घेत सरकारला जाग यावी म्हणून संभळ, खंजिरी, तूनतुने अशी वाद्य वाजवीत शासनाचा विरोध केला.

देशातील मथुरा काशी अक्षरधाम तिरुपती सारखी मंदिरे उघडली आहेत तर मग महाराष्ट्र राज्यातील मंदिरे बंद का असा सवाल निलेश जगताप यांनी करीत शासनाने सुरक्षित अंतर आणि योग्य काळजी घेत मंदिरे उघडली पाहिजेत अन्यथा भाजपा सर्वसामन्य लोकांना करिता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय राहणार नसल्याचे हि जगताप यांनी सांगितले. काही हि असो भाजप पक्षाचे हे दुसरे आंदोलन असून अनेक संघटना पक्ष्यांनी जेजुरीच्या दरबारात मंदिर उघडण्या करिता आंदोलने केली आहेत परंतु अद्यापही सरकार गप्प का हा प्रशन मात्र सामान्यांना पडला आहे.