Pune : कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाची दुचाकी अडवून 40 हजारांची रोकड चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भरदिवसा कोथरुड भागात बँकेत हप्ता भरण्यास निघालेल्या तरुणाची दुचाकी अडवून ४० हजारांची रोकड चोरट्यांनी भरदिवसा रोकडची पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी प्रसाद आढाव (वय ३५, रा. वारजे माळवाडी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सीसीटीव्ही बसविण्याचे काम करतात. दुपारी त्यांनी एका बँकेतून ४० हजारांची रोकड काढली होती. रोकड दुसऱ्या बँकेत घेउन जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना दुचाकी आडवी मारली. त्यामुळे प्रसाद यांनी दुचाकीचा वेग कमी केला. नेमकी संधी साधून चोरट्यांनी त्यांची त्याच्याकडीत ४० हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही पुटेजची तपासणी सुरु असल्याचे सहायक निरीक्षक धीरज गुप्ता यांनी सांगितले.