कुसगाव धरणात दोघे बुडल्याची भिती

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – हिंजवडीपासून जवळ असलेल्या कुसगाव धारणामध्ये वाकडहून फिरायला गेलेल्या तरुणांपैकी दोघेजण बुडाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी पाहणी करुन एनडीआरएफचे रेस्क्यू पथक पाचारण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज धुळवड असल्याने वाकड येथील तरुण कुसगाव धरणावर फिरायला गेले होते. धरणाच्या कडेला काहीजण फिरत होते, तर काहीजण आजू-बाजूला होते. दरम्यान, त्यांच्यापैकी दोन जण तेथून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. मित्रांनी त्या दोघांचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ते आढळून आले नाहीत.

नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तळेगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी करुन एनडीआरएफचे रेस्क्यू पथक बोलावले आहे. या पथकाचे जवान शोध घेणार आहेत. मात्र, काही वेळातच अंधार होऊ शकतो त्यामुळे तपास बंद करावा लागणार आहे.

You might also like