‘कोरोना’ संकटात तळीरामांनी वाचवली अर्थव्यवस्था ? 4 महिन्यात तिजोरीत कोटींचा महसूल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोना संकट काळात राज्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळं अर्थव्यवस्था कोसळली होती. अनेक विरोध आणि समर्थनार्थ राज्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली होती. राज्याच्या अर्थव्यवस्थेला तळीरामांचा आधार मिळाला असं म्हणावं लागणार आहे. कोरोनाच्या काळात रोजगार बुडाल्यानं आर्थिक स्थिती खालावली परंतु एकीकडे ही स्थिती मद्य विक्रीमुळं सुधारली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 4 महिन्यात 1509 लिटर मद्य विक्री झाली आहे. यातून राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. तब्बल 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. यात 682 कोटींची देशी दारू तर 1568 कोटींचं विदशी मद्य तर 111 कोटी एवढा महसूल बिअर विक्रीतून मिळाला आहे.

सध्या राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. अशात अनेक व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. बाहेर पडणाऱ्या लोाकांची संख्या देखील आता वाढताना दिसत आहे. परंतु यातून कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

राज्य अनलॉक च्या चौथ्या टप्प्यात आहे. राज्यात रुग्णांचा रिकव्हरी रेटही 72 टक्के एवढे झाला आहे. राज्यात तब्बल 2 लाख 93 हजार 548 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.