home page top 1

काश्मीरवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञाची खुर्ची तुटली, पुढं झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानला त्यांच्या देशात सुरु असलेली मंदी, बेरोजगारी तसेच कोलमडणारी अर्थव्यवस्था यापेक्षा भारत आणि काश्मीर यांचीच जास्त चिंता आहे. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या डीबेटमध्ये दिसून आला. चॅनेलवर काश्मिर आणि कलम ३७० बद्दल जोरदार चर्चा सुरु होती.

डीबेटच्या वेळेस पाकिस्तानी विश्लेषकाने यावेळी आपले मत मांडायला सुरुवात केली आणि त्यांची खुर्चीच तुटली. यावर अँकर मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत राहिली. लाईव्ह सुरु असलेल्या चर्चेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडिओचा चांगलाच समाचार घ्यायला सुरवात केली आहे. काही जणांनी तर चक्क ही खुर्ची चीनची होती का ? अशी विचारणा केली आहे तर अनेकांनी याची खिल्ली उडवली आहे. या आधीही अनेकदा पाकिस्तानी वृत्तवाहिनीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानमधील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत. पंप्रधान इम्रान खान यांच्या सभेचा सुद्धा असा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like