‘लॉकडाऊन’मध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या पतीनं बनवला पास्ता, अभिनेत्रीनं केलं KISS ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमध्ये टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहियाचा पती विवेक दहिया याचं एक असं टॅलेंट पहायला मिळालं ज्यामुळं त्याला इम्प्रेस झालेल्या दिव्यांकानं पती विवेकाल किस केलं. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दिव्यांकाचा पती विवेकचं हे टॅलेंट कुकिंगचं आहे. व्हिडीओत दिसत आहे की, पतीनं बनवलेली डिश खाल्ल्यानंतर ती इम्प्रेस होऊन त्याच्या हाताला किस करते. विवेकनं दिव्यांकासाठी फ्रेंच स्टाईलमध्ये पास्ता बनवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओत विवेक फ्रेंच बोलतानाही दिसत आहे. त्यानं बनवलेली डिश दिव्यांकाला खूप आवडली. तिनं खुश होऊन त्याच्या हाताला किसही केलं आहे. यावर विवेक म्हणतो, बरंय बनवणाऱ्याच्या हाताचं चुंबन घेतलंय कापले नाहीत. यावर दिव्यांका म्हणते माझी इच्छा आहे की रोज तू असं बनवावस.”

दिव्यांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालयचं झालं तर जेव्हा टीव्हीवर रामायणचा रिमेक बनवण्यात आला होता तेव्ही दिव्यांका त्रिपाठी हिला निवडण्यात आलं होतं. 2012 मध्ये ही मालिका प्रसारीत झाली होती. तिनं ये हैं मोहब्बतें मालिकेत डॉ. इशिताचा रोल केला होता. यातून तिनं आपली ओळख तयार केली होती. यातून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

View this post on Instagram

Pink or blue? I say – BOTH!

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on