‘लॉकडाऊन’मध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूजनं घरीच केला ‘ ! फोटो शेअर करत म्हणते…

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळं सारं काही बंद आहे. बॉलिवूड स्टार इलियाना डिक्रूज हिन आता सर्व ब्युटी पार्लर बंद असल्यानं स्वत:च आपले केस कापले आहेत.

इलियानानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आपला हेअरकट फ्लाँट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना इलियानानं लिहिलं की, “तर मी माझे केस कापले आहेत.”

https://twitter.com/30Kumaar/status/1257218197687865345?s=20

इलियानानं शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत तिचा चेहरा दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, ती स्माईल करत आहे. तिची स्माईल चाहत्यांना खूप आवडते. दुसऱ्या फोटोत ती म्हणते की, गेल्या वेळचे तुलनेत हा इतकाही वाईट नाही. जेव्हा सात वर्षांची होते आणि माझ्या बाहुल्यांवर मी याचा प्रयोग केला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1257218262238212097?s=20

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता. यानंतर आता ती अजय देवगण निर्मित द बिग बुल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.