Lockdown 2.0 : ‘ब्यूटी पार्लर’ आणि ‘सलून’ उघडण्याचा आदेश दिला होता काय, गृह मंत्रालयानं दिलं ‘हे’ सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी गृह मंत्रालयाने शनिवारपासून काही अटींसह सवलत दिली आहे. यामध्ये काही सूचनांसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. या सूचनांनंतर अनेक भागात ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची बाबही समोर आली. त्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

ही सूट सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यासाठी नसल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘आमचे आदेश त्या दुकानांना लागू आहे जे सलून आणि ब्युटी पार्लरशी संबंधित सामानाची विक्री करतात. सध्या न्हावीची दुकाने आणि ब्युटी पार्लर आणि सलून खोलण्याचे कोणतेही आदेश नाहीत. दारूची दुकाने सुरू करण्याचाही आदेश नाही.’

त्या म्हणाल्या कि गृह मंत्रालयानुसार, रेस्टॉरंट खोलण्याचे कोणतेही आदेश नाहीत, कोणत्याही प्रकारचे रेस्टॉरंट खोलण्याचे आदेश नाहीयेत.

पहिले आदेश काय होते?
गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा नॉन-हॉटस्पॉट्स आणि नॉन कॅन्टोन्मेंट क्षेत्रात अनावश्यक वस्तूंची दुकाने खोलण्याबाबत आदेश दिला होता. मॉल्स आणि सुपर मार्केटमध्ये असलेले ब्युटी पार्लर आणि सलूनला सध्या बंद ठेवण्याचा आदेश होता. या व्यतिरिक्त महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील बाजार परिसरातही सध्या उघडणार नाहीत.

कोणती दुकाने उघडण्याची मिळाली परवानगी

१. संबंधित राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने, ज्यात महापालिका व नगरपालिका बाहेरील निवासी परिसरासह व बाजार परिसरामधील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे.

२. महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत, आसपासची दुकाने, स्टँडअलोन दुकाने व निवासी परिसरामध्ये दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

३. महानगरपालिका व नगरपालिकांच्या बाहेरील नोंदणीकृत बाजारपेठांमध्ये असलेली दुकाने फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांसह उघडतील. सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि मास्क घालणे अनिवार्य आहे.

४. ग्रामीण व अर्ध-ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

५. शहरी भागात, अनावश्यक वस्तू आणि सेवा चालवण्यास परवानगी देण्यात येईल, जर ते निवासी भागात असतील तर.

६. ग्रामीण भागात, अनावश्यक सेवा सर्व प्रकारच्या दुकानात विकल्या जाऊ शकतात.

७. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी आहे.

८. कोरोना व्हायरस लॉकडाउन दरम्यान आजूबाजूच्या सर्व छोट्या दुकानांना उघडण्याची परवानगी दिली जाईल.