‘लॉकडाऊन’मध्येच ‘या’ अभिनेत्रीनं दिली ‘Good News’ ! दुसऱ्यांदा बनली ‘आई’

पोलीसनामा ऑनलाईन :मुंबईसहित देशभरात लॉकडाऊन आहे. अशा कठिण काळात एक गोड बातमी समोर आली आहे. टीव्हीच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. खास बात अशी की, ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचं नाव आहे दीया चोपडा. दीया चोपडा हिनं इंस्टावरून ही गोड बातमी शेअर केली आहे. तिनं मुलीचं नावही सांगितलं आहे.

दीया या लॉकडाऊनच्या कठिण काळात दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिनं आपल्या मुलीचं नाव सोफिया ठेवलं आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यावर लिहिलं आहे की, “ईवान खूपच आनंदानं ही घोषणा करत आहे की, त्याची गोंडस बहिण सोफिया मेहता या दुनियेत सुरक्षित आली आहे. 6 एप्रिल 2020 रोजी आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे.”

कॅप्शनमध्ये दीयानं लिहिलं की, “स्वागत हे नन्ही परी. तू आमचं कुटुंब पूर्ण केलं आहेस.” दीयाला एक मुलगा आहे ज्याचं नाव ईवान आहे. दीयानं दीर्घकाळ रिची मेहता याला डेट केलं होतं. नंतर तिनं या एनआरआय बॉयफ्रेंडसोबत 27 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केलं.

दीयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक मोठ्या शोमध्ये काम केलं आहे. मन की आवाज प्रतिज्ञा, लेफ्ट राईट अशा अनेक मालिकेत ती दिसली आहे. याशिवाय मिसेस कौशिक की पांच बहुए, छनछन अशा मालिकेत काम करून तिनं चाहत्यांच्या मनात जागा तयार केली आहे.