त्वचारोगाने जनता ‘बेहाल’ ! उपचारावर हजारो रुपयाचा खर्च, परिणाम मात्र ‘नगण्य’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या बदलत गेलेल्या जीवन शैली व वाढत्या प्रदुषणाने अनेकविध आजारांनी तोंड वर काढले असून सर्वसामान्य माणूस यामुळे गांगरून गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने त्वचारोगाचे प्रमाण प्रचंड असून यावर कोणताही त्वचारोग तज्ञ रुग्णांची सुटका करताना दिसत नाही यामुळे सर्वसामान्य लोकांचे अर्थिक बजेट बिघडले आहे. औषध प्रशासनाने लवकरात लवकर संशोधन करुन जालीम उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

माणसाने अधुनिकतेच्या नावाखाली निसर्गावर आक्रमक केले याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले प्रदुषणाने उच्चांक गाठला.याचा सरळ परिणाम माणसावर होत गेला.हवा व जल प्रदुषणाने कहर केला आहे. पुणे शहरातून वाहणारी मुळा मुठा नदी एकेकाळी जीवनदायीनी वाटायची परंतु आज तीच अनेक आजाराची जननी झाली आहे. प्रदूषाणाची पातळी इतकी भयंकर वाढली की सध्या या नदीकाठच्या गावांमधील सर्व जलस्त्रोत पूर्णपणे बाधित झाले आहेत. याचा परिणाम पूर्वेकडील बहुतेक गावात त्वचा विचाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या हे प्रमाण इतके वाढले आहे की दर चार रुग्णामागे एक त्वचेचा रुग्ण आढळतो आहे.

या त्वचा आगारामध्ये अंगाला खाज सुटण्यापासून अंगावर वृण तयार होण्यापर्यंत अनेक प्रकार वाढले आहेत. हा आजार बरा व्हावा म्हणून सर्वसामान्य माणूस डाॅक्टराकडे जातो. परंतु त्वचारोग तज्ञ यावर वेळ काढू औषध देऊन तात्पुरता इलाज करतात. परंतु यावर तोडगा काढण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही असे अनेक रुग्णांचे म्हणणे आहे. वैद्यकीय पेशा हा दिवसेंदिवस व्यावसायिकतेकडे वळताना दिसतो आहे. यावर मानव संसाधन विभागाने वेळीच लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे. भारतीय नागरिकाला सुदृढ अरोग्य मिळाले पाहिजे हे शासनाने वेळीच समजले पाहिजे.

यावर उपाययोजना करताना अगोदर नदी प्रदुषण थांबवले पाहिजे त्यासाठी कडक व निश्चित उपाय शोधून काम करावे लागणार आहे.