अलर्ट ! मार्चमध्ये सलग 6 दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर मार्चच्या सुरुवातीला तुमचे बँकेत काही महत्वाचे काम असेल तर ते लवकरात लवकर उरकून घ्यावीत. मार्चमध्ये होळीचा सण असल्याने बँका लागोपाठ 6 दिवस बंद असतील. मार्चमध्ये संप आणि सुट्ट्या यामुळे बँकेच्या कामकाजावर 10 मार्च ते 15 मार्च परिणाम होऊ शकतो. 10 मार्चला धुलीवंदन आहे यामुळे बँक बंद असेल. याशिवाय बँक युनियनने 11 ते 13 मार्च या तीन दिवस संपाचा इशारा दिला आहे. 14 मार्चला दुसरा शनिवार आहे आणि 15 मार्चला रविवार आहे. 10 मार्चपासून लागोपाठ 6 दिवस बँक बंद असतील, परंतु यापूर्वी 8 मार्चला रविवार आहे. दुसऱ्या आठवड्यात बँक फक्त 9 मार्चला सुरु राहिलं.

11 ते 13 मार्च बँकेचा संप –
वृत्तानुसार बँक युनियनने 11 ते 13 मार्च तीन दिवस संपाचा इशारा दिला आहे. कर्मचारी यापूर्वी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संपावर होते. त्यांचे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांचा पगार पाच वर्षांनी रिवाइज केला जातो. मागील वर्षी 2012 मध्ये वेतनवाढ देण्यात आली होती. यानंतर 2017 सालची वेतनवाढ प्रलंबित आहे. याच मुद्यावरुन कर्मचारी संपावर जात आहेत. याशिवाय युनियनची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना देखील आठवड्यातून 2 सुट्ट्या मिळाव्यात. बँके कर्मचाऱ्यांच्या काही अन्य मागण्या देखील आहेत. जसे की बेसिक पे सह स्पेशल अलाउंसेस, कौटूंबिक पेंशनमध्ये सुधार इत्यादी.

21 ते 23 फेब्रुवारी बंद होत्या बँका –
फेब्रुवारी महिन्यात 21 ते 23 फेब्रुवारी बँका बंद होत्या. 21 फेब्रुवारीला शुक्रवारी महाशिवरात्री होती. त्यानंतर 22 फेब्रुवारीला महिन्याचा चौथा शनिवार होता तर 23 फेब्रुवारीला रविवार. यामुळे बँका तीन दिवस बंद होत्या.