मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून २९ एप्रिलला मावळ मतदार संघात मतदान होत आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. एकाच घरातील तीन जणांना उमेदवारी दिली तर कार्यकर्त्यांचे काय असा सवाल करत त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिला होता. मात्र, आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपण माढ्यातून लढणार नसल्याचे जाहीर करुन पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

मावळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पार्थ पवार इच्छूक आहेत. त्यांनी मावळ मतदार संघात फिरुन कार्य़कर्त्यांच्या बैठका आणि भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पार्थ पवार यांना मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. सलग दोन वेळा शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळ मतदार संघ तिसऱ्यावेळी भगवा फडकविण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत.

मावळातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे मावळात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. मावळ मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाने देखील पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती. घाटाखाली रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचे प्राबल्य आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्य़कर्त्यांनी देखील पार्थ पवार यांना पसंती दिली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

कष्टाचं झालं चिज ! वेटर बनला पोलिस उपनिरीक्षक

मी माढामधून लढणार नाही : शरद पवार

चार महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून करून पती पसार

काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभेची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता