दुपारी 1 वाजेपर्यंत मावळमध्ये 31.83% तर शिरूरमध्ये 30.41% मतदान

मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव सुरू आहे. त्यातील राज्यातील चोथ्या टप्प्यातील लक्षवेधी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मावळ मतदार संघात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सहा तासात 31.83 % मतदान झाले तर शिरूर मतदार संघात 30.41 % मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दीमुळे उत्साहाच वातावरण आहे. मात्र उच्चांग गाठलेल्या तापमाणामुळे दूपार नंतर मतदानही कमी होण्याची शकत्या वर्तवली जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील नोंद

मावळ 30.07 %
पिंपरी 30.80 %
चिंचवड 35.08 %
पनवेल 31.90 %
कर्जत 29.50 %
उरण 31.38 %

एकूण – 31.68%

शिरूर लोकसभा मतदारसंघातील नोंद

शिरूर 31.64 %
भोसरी 31.55 %
जुन्नर 34.38 % %
आंबेगाव 37.69 %
खेड 29.96 %
हडपसर 22.20 %

एकूण – 30.41%