आठवणींचे कोलाज : प्रिया तेंडुलकर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि मराठीतील समर्थ लेखिका प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन आहे. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत्या.नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेक विविध माध्यमांतून स्वत:ला आजमावत स्वत:ची जागा निर्माण केली. प्रिया विजय तेंडुलकर यांचा जन्म १९ सप्टेंबर २००२ मुंबई येथे झाला.

प्रिया तेंडुलकर यांनी १९६९ साली गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ या नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ‘पिग्मॅलियन’, ‘अँजी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाइंडर’, ‘कमला’ अशा काही नाटकांमधूनही प्रिया तेंडुलकर यांनी भूमिका केल्या.

भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार

प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची ‘रजनी’ ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्‍मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर ‘दामिनी’ या मराठी मालिकेचा समावेश होतो.  १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. याव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

खाजगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झालेल्या ‘प्रिया तेंडुलकर टॉक शो’ आणि त्यानंतर ‘जिम्मेदार कौन’ या राजकारणाशी आणि समाजकारणाशी संबंधित चालू घडामोडींवर आधारित चर्चात्मक कार्यक्रमाने  त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली . त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जगाची ओळख करून देणारे स्वानुभव त्यांनी ‘पंचतारांकित’ या चरित्रवजा पुस्तकात अतिशय सहजसोप्या  शैलीत मांडले आहेत.

प्रिया यांचे वयाच्या ४२व्या वर्षी १९ सप्टेंबर २००२ रोजी प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी  कॅन्सरने निधन झाले .‘तें’ची प्रिया – एक जीवनप्रवास.. हे त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक ललिता ताम्हणे या मैत्रिणीने लिहले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6b7856c-bc0c-11e8-b3f4-094c3dbd7245′]