मोदींच्या स्वच्छ भारतात हाताने मैला काढावा लागतो : राहूल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत योजना म्हणजे निव्वळ घोषणाबाजी आहे. हजारोंच्या संख्येने हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांकडे मोदी सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. गटार सफाईचे काम करताना गुदमरून मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्याबद्दल देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच याच मुद्यावरून राहुल गांधीनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02c1167a-bc89-11e8-8b4e-53aab784a899′]

दिल्ली जल मंडळाअंतर्गत गटार साफ करताना अनिल या सफाई कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. ट्विटरवर अनिल (३७) यांच्या मृतदेहासमोर रडणाऱ्या त्यांच्या मुलाचा फोटो पाहून देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे. मोदींच्या स्वच्छ भारतात सफाई कामगार अजूनही अमानवी परिस्थितीत काम करत असल्याचे त्यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

अक्षय मोरे हत्या प्रकरणातील ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा