Coronavirus : मुंबईत आणखी 12 पोलीस अधिकारी :कोरोना’बाधित, 54 जणांना केलं ‘क्वारंटाइन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलिसांची मोठी भूमिका आहे. सुरक्षा राखण्यापासून ते गरिबांना धान्य पोहोचवण्यापर्यंत अशी अनेक कामं पोलिसांना करावी लागत आहेत. त्यातच परप्रांतीय मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांवर ताण येत आहे. कायम लोकांच्या संपर्कात राहिल्याने मुंबई पोलीस दलातील आणखी 12 पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या 54 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सर्वजण जे जे पोलीस ठाण्यातील असून यामध्ये पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे जे जे पोलीस ठाणे सॅनिटाईज करण्यात आलं आहे.

देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. यावर कठोर निर्णय घेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे अशा सूचना सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असं नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसं येईल हे पहावं असं मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांना बाजवण्यात आलं आहे.