मुंबईतून E-पाससाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांचे तब्बल 73 % अर्ज नाकारले; पोलिसांनी सांगितले ‘हे’ 2 कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवर जाण्या येण्यास बंदी घातली आहे. परंतु अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी पोलिसांकडून E-Pass सेवा देण्यात आली आहे. मात्र, मुंबईमधून अन्य ठिकाणी जाण्यासाठी E-Pass साठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची जवळपास ७३ टक्के अर्ज पोलिसांकडून नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यात प्रवास करण्यासाठी ६.८ लाखाहून जास्त इतक्या लोकांनी E-Pass साठी अर्ज केला होता. परंतु, पोलिसांकडून त्यामधील ५४ % अर्ज नाकारण्यात आले आहेत. तसेच, मुंबईमध्ये तब्बल ७३ % इतक्या प्रमाणात नागरिकांचे E-Pass अर्ज फेटाळून लावले आहे. यामधील अर्ज नाकारण्या मागील दोन महत्वाचे कारण आहेत. की, ते म्हणजे अर्जदारांकडे आपत्कालीन प्रवासासाठी योग्य कारण नव्हते. शिवाय अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करतोय, याचा पाठपुरावा करू शकतील, अशी कागदपत्रं अपलोड करण्यात आली नव्हती. अशा २ कारणाने मुंबईमधील ७३ % लोकांचे अर्ज पोलिसांनी नाकारले आहेत.

या दरम्यान, जे अर्ज पोलिसांनी नाकारले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे व्यावसायिक बैठक, इतर राज्यातून घरी परतायचं आहे, धार्मिक विधी अथवा कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे, अशी करणे नमूद केली आहे. म्हणून त्या नागरिकांचे अर्ज नाकारले आहेत. अशी माहिती E-Pass प्रशासनानी दिली आहे.