Lockdown : मुलानं आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांना आईसह नेलं बाईकवर, केला 25 KM प्रवास, जाणून घ्या

मुंबई  :  पोलीसनामा ऑनलाईन  –   देशात कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना भिवंडीत घडली आहे. एका मुलाला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्याला आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांना बाईकवर रुग्णालयात घेऊन जावे लागले. त्याच्याबरोबर त्याची आईसुद्धा होती. त्यांनी अशा अवस्थेत जवळपास 25 किमीचा मुंलूंड ते भिवंडी असा जीवघेणा प्रवास केला.

भिवंडीच्या पद्मानगर इथं वास्तव्य करणारे विरस्वामी कोंडा यांना तोंडाचा कॅन्सर झालेला होता. त्यामुळे त्यांच्यावर मुलूंडच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. दरम्यान आजच (11एप्रिल) त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. दररोजचा वाढणारा दवाखान्यातील खर्च त्यांना परवडणारा नव्हता म्हणून त्यांनी तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. पण अतोनात प्रयत्न केल्यानंतरही त्यांना रुग्णवाहिका मिळू शकली नाही. शेवटी न राहता त्या मुलाने आपल्या बाइकवरूनच आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांना घेऊन जाण्याचे ठरवले.

मुलाने बाईकवर कॅन्सरग्रस्त वडिलांना मध्ये बसवले आणि मुलाची आई आपल्या पतीला सांभाळत मागे बसली. त्या मुलाच्या वडिलांच्या नाकात अन्नासाठी टाकलेली नळी देखील तशीच होती. अखेर त्याने आपल्या वडिलांना आणि आईला बाईकवर घेऊन मुलूंड ते भिवंडी असा ट्रिपल सीट प्रवास केला.

दरम्यान यांना प्रवासा दरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवलं पण बाईकवर रुग्ण असल्याने कुणीही कारवाई न करता जाऊ दिले. परंतु सर्वांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली पण कोणीही रुग्णवाहिका अथवा वाहनाची व्यवस्था केली नाही. दरम्यान ते खरतड प्रवास करत रात्रीच्या सुमारास भिवंडी शहरात पोहोचले.