बिहारमध्ये 3 वृध्द महिलांना पंचायतनं दिली ‘ही’ शिक्षा, ऐकून होईल माणुसकीचा देखील अपमान

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील हतौडी क्षेत्रात डकरामा नावाचे गाव आहे. नुकतेच 4 मे च्या दिवशी या गावच्या पंचायतीने भयानक काम केले. त्यात तीन वृद्ध महिलांना शिक्षा करण्यात आली. या शिक्षेनुसार त्यांचे प्रथम मुंडण करण्यात आले, नंतर त्यांना मूत्र पाजण्यात आले आणि संपूर्ण गावाला चक्कर मारण्यास सांगितले.

या महिलांना इतकी भयानक शिक्षा का देण्यात आली असा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही. तर या शिक्षेचे कारण म्हणजे तिन्ही महिला चेटूक करत असल्याचा ग्रामस्थांना संशय होता. त्यामुळे ग्रामस्थ पंचायतीत पोहोचले. त्यानंतर सर्व जण बसले आणि ही शिक्षा सुनावली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

गर्दी फक्त तमाशा पाहत राहिली

व्हिडिओमध्ये असे दिसून आले की तिन्ही महिला असहाय्यपणे बसलेल्या आहेत. जवळ उभी असलेली गर्दी आवाज करत आहे. त्यांना मूत्र पाजले जात आहे आणि लोक हसत आहेत. महिला शांतपणे शिक्षा सहन करीत आहेत. त्यांनी स्वत:ला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकले नाही. एक माणूस जेव्हा त्यांच्या मदतीसाठी पुढे आला, तेव्हा त्यालाही या स्त्रियांप्रमाणेच शिक्षा करण्यात झाली. त्यानंतर पंचायतीने तिन्ही महिलांना गावातून हद्दपार केले. त्यांनतर त्या तेथून निघून गेल्या. तिघांपैकी एक महिला डकरामाची रहिवासी आहे. इतर दोघी त्या महिलेच्या नातेवाईक होत्या ज्या की दुसर्‍या गावातून आल्या होत्या.

पोलिसांनी काय केले?

एका वृत्तसंस्थेने माहिती दिली की 10 नामजद आणि 20 अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आली आहे. तर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्याने स्त्रियांचे मुंडण केले आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गाववाल्याने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ही कारवाई झाली. सहायक पोलिस अधीक्षक (ASP) अमितेश कुमार म्हणाले की, कोणत्याही ग्रामस्थांकडून पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही, ही बातमी माध्यमांकडून मिळाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की चौकशी केली जात आहे.