नागपुरात गडकरी आणि शिवसेनेत रंगणार सामना

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता धुसर झाली असून, नागपुरात शिवसेना गडकरींच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील युती होणार नसल्याचा दावा केला आहे. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे जर युती नाही झाली तर थेट गडकरी आणि शिवसेनेचा नागपुरातच सामना रंगण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd5271a8-a6d4-11e8-9132-8142f1bb0c2a’]

मागील काही महिन्यांअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरमध्ये विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन्ही पक्षात युती होईल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र भाजप व शिवसेनेत युती होणे आता शक्य नाही. आपण स्वबळावर आपली ताकद दाखवून देऊ. यापुढे नागपुरमध्ये देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात उभा करु असे कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.

तसेच नागपूर विभागातील चारही लोकसभा जागांवर जोरदार निवडणूकांसाठी तयारी करु. यात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, रामटे यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.