नागपूरमध्ये ‘स्पेशल २६’ गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठंय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात चक्क नकली क्राईम ब्रँच म्हणजेच गुन्हे अन्वेषण शाखाच सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुख्य म्हणजे एका भाड्याच्या घरात ही शाखा सुरु करण्यात आली होती. क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी नावाने ही नकली क्राईम ब्रांच चालवली जात होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले आहे. याबाबत चे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर आकाऊंटवरून करण्यात आले आहे .”नागपूरमध्ये ‘स्पेशल २६ चित्रपटाचा रिमेक, आता मुख्यमंत्र्यानी नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे ” असा टोला देखील राष्ट्रवादी ने लगावला आहे.

नक्क्की काय आहे राष्ट्रवादीचे ट्विट

‘नागपूरमध्ये ‘स्पेशल २६’ अशा मथळ्याचे हे ट्विट आहे. नागपूरमध्ये स्पेशल २६ चित्रपटाचा रिमेक, गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष कुठंय ? अशा स्वरूपाची पोस्ट टाकण्यात आली आहे. ‘नागपुरात एका पठ्ठ्याने चक्क क्राइम ब्रँचची बनावट शाखाच सुरू केली होती. मुख्यमंत्रीच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांना नागपूरचा अभिमानही आहे. आता त्यांनी नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावे, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे.’ अशा शब्दात राष्ट्रवादीने ट्विट केले आहे.

भाड्याच्या घरात थाटली क्राईम ब्रांच ; पोलिसांनी केला पर्दाफाश

एका बहाद्दराने चक्क नकली क्राईम ब्रांच म्हणजेच गुन्हे अन्वेषण शाखाच सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुख्य म्हणजे एका भाड्याच्या घरात ही शाखा सुरु करण्यात आली होती. क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी नावाने ही नकली क्राईम ब्रांच चालवली जात होती. याचा पडदा फाश करण्यात आला आहे. नागरपूरच्या समर्थनगर भागातील ही घटना आहे. नरेश पालरपवार असं त्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी सदर नकली एजन्सी चालवत होता असे उघड झाले आहे.

सदर नकली क्राईम ब्रांचबद्दल पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काल (22 फेब्रुवारी) सायंकाळी पोलिसांनी क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सीच्या कार्यालयावर धाड टाकली. यानंतर नरेशची पळता भुई थोडी झाली. पोलिसांना त्याला तात्कळ ताब्यात घेतले. इतकेच नाही तर त्याच्या या नकली कार्यालयात काही कागदपत्रेही सापडली आहेत. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रेही जप्त केली आहेत.

या आरोपीचं धाडस असं की, नरेश पालरपवार याने स्वतःच्या कारवर डायरेक्टर क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी असा बोर्डही लावला होता. शिवाय याच कारने तो शहरभर फिरतही होता. नरेश पालरपवारने क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सीच्या माध्यमातून काही अशिक्षित लोकांना आम्ही तुमच्या प्रकरणाचा तपास करुन देतो, असं सांगून फसवणूक केल्याची पोलिसांना शंका आहे.

या घटनेनंतर आणि पोलिसांच्या या स्तुत्य कामगिरीनंतर नागपुरात मात्र वेगळ्याच चर्चेला उधाणा आले आहे. आता पोलीस जनतेला न्याय देण्यास अपयशी ठरतात म्हणून अशा भामट्यांचा फावते का असा प्रश्न आता नागपुरात चर्चेत आल्याचे दिसत आहे.