शिवसेनेला धडा शिकविणार, ‘या’ भाजप खासदाराची थेट ‘धमकी’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या 125 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. यात लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे संतापलेल्या चिखलीकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकी दिली आहे.

प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की , ‘शिवसेनेने केवळ मी भाजपमध्ये गेल्याने आपल्या मुलाचा पत्ता कापला असेल तर शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.’ लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडून भाजपला मिळेल अशी त्यांना आशा होती. त्या जागेवर आपल्याला मुलाला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र ही जागा शिवसेनेकडे कायम राहिली. शिवसेनेकडून लोह्यात मुक्तेश्वर धोंडगे यांचं तिकीट निश्चित मानलं जातं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून भाजपचे प्रताप चिखलीकर नांदेड मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यापूर्वी ते प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेना आमदार होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.

Visit : policenama.com