नवीन वर्षात WhatsApp मध्ये एकदम ‘ढासू’ फीचर येतंय, ‘चॅटिंग’ बदलणार

पोलीसनामा ऑनलाइन – येत्या नव्या वर्षात व्हाट्सऍप अनेक दमदार फीचर्स आणणार आहे. हे फीचर्स आतापर्यंत IOS आणि Android च्या बीटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आले आहे. व्हाट्सऍपचे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने अनेकदा नवे फीचर्स स्पॉट केले आहेत. नव्या वर्षात व्हाट्सऍपमध्ये Disappearing Messages हे फीचर येणार असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या नवीन फीचरमुळे व्हाट्सऍप वापरण्याच्या पद्धतीत बदल होईल. तसेच नव्या वर्षातील व्हॉट्सअ‍ॅपचं हे सर्वात मोठं फीचर असल्याचंही सांगितलं जात आहे. नव्या फीचरद्वारे, युजरने सेंड किंवा रिसिव्ह केलेले मेसेज ठरवलेल्या वेळेनंतर ऑटोमॅटिकली गायब होतील. हे फीचर सुरूवातीला फक्त ग्रुप अ‍ॅडमिनच वापरु शकतील, असं सांगितलं जातंय. तसेच डार्क मोड, फेस अनलॉक, लास्ट सीन फॉर सिलेक्टेड फ्रेंड्स आणि फेसबुक पे यांसारखे फीचर्सही येणार आहेत.

मेसेज डिलिट करण्याचे सहा पर्याय –
हे फीचर ऑक्टोबरमध्ये अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये Disappearing Messages या नावाने स्पॉट झाले होते. नंतर नोव्हेंबरमध्ये हेच फीचर डिलिट मेसेज या स्वरुपात बीटा व्हर्जनमध्ये दिसले होते. हे फीचर केवळ ग्रुप चॅट्ससाठी कार्यरत असून फक्त ग्रुपच्या अ‍ॅड्मिनकडेच ते वापरण्याचे अधिकार असल्याचे लक्षात आले. काही अहवालानुसार, Delete Messages चा पर्याय ग्रुप सेटिंग्समध्ये असेल. तसेच त्यात Edit Group Info, Send Message आणि Edit Group Admins यांसारखे पर्याय असणार आहेत. मेसेज किती वेळाने आपोआप डिलिट व्हावा, याचे अधिकार ग्रुपअ‍ॅडमिनकडे असतील. या फीचरबाबत आतापर्यंत जे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत त्यानुसार, मेसेज डिलिट करण्यासाठी ऑफ, १ तास, १ दिवस, १ आठवडा, १ महिना आणि १ वर्ष, असे सहा पर्याय मिळणार आहेत. तर, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अपडेटमध्ये पाच सेकंद किंवा एक तासाचा पर्याय मिळेल.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !