शांततेच्या नोबेल पुरस्कराच्या शर्यतीत होते डोनाल्ड ट्रम्प,  हुकूमशाह किम-जोंग-उन

लंडन : वृत्तसंस्था 
डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. मुकवेगे आणि मुराद या दोघांनी युद्धादरम्यान लैंगिक हिंसेतील पीडितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bdb7a62e-c89d-11e8-b440-61d7fd0144d9′]

डेनिस हे आफ्रिकी देश डेमॉक्रेटिक रिपब्‍लिक ऑफ कांगो येथील आहेत. तर नादिया या यहुदी असून इराक येथे राहणार्‍या आहेत. डेनिस यांनी संपूर्ण जीवनभर युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांचे रक्षण केले. नादिया मुराद या इराकमधील अल्‍पसंखय यहुदी समाजातील आहेत. त्यांना दहशतवाद्यांनी पकडले होते. तसेच त्यांच्यावर अनेकदा दहशतवाद्यांनी लैंगिक अत्याचार केले. कित्येकदा जबरदस्‍ती होऊनही त्या डगमगल्या नाहीत आणि सर्वोच्‍च बहादुरी दाखवल्याने त्यांना नोबेल देण्यात येत असल्याचे समितीने म्‍हटले आहे.
दरम्यान, २५ वर्षीय नादिया या शांततेचं नोबेल मिळवणार्‍या दुसर्‍या तरुण महिला आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये मलाला युसुफजई यांना वयाच्या १७ व्या वर्षी शांततेचं नोबेल मिळालं होतं.

मिस वर्ल्डच्या काँटेस्टनटला येईना H2O ची संज्ञा…


शांततेच्या नोबेल पुरस्कराच्या शर्यतीत होते डोनाल्ड ट्रम्प,  हुकूमशाह किम-जोंग-उन –

शांततेचा नोबेल पुरस्कार देणारी समितीनुसार, यावेळी २१६ व्यक्ती आणि ११५ संस्थांचा विचार करण्यात आला होता. जगात शांतता टिकून राहावी यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यावर्षी एकूण ३३१  व्यक्तींच्या नावांचा विचार करण्यात आला होता. मात्र, यापैकी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम-जोंग-उन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-इन पोप फ्रान्सिस यांच्याही नावांचा समावेश होता.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc46a9b1-c89d-11e8-87ac-8ddc740b9b0d’]