गुंड सनी कांबळे खून प्रकरणातील संशयित अद्यापही पसारच

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

संजयनगरमधील गुंड सनी कांबळे याच्या खूनप्रकरणात कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज अद्यापही पसारच आहे. दरम्यान यातील पाच संशयितांना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्या. एन. आर. इंदलकर यांनी शुक्रवारी दिले. दरम्यान रंगरेजच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी सांगितले.

गुंड सनी कांबळे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी इमाम ऊर्फ जिच्या शेख, संदीप भोसले, अक्षय मोहिते, धनाजी बुवनूर, रफीक शेख यांना गुरुवारी अटक केली. त्याशिवाय यातील मुख्य सूत्रधार अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ceb3ab6-c8af-11e8-a929-f9b1d9d920e1′]
बुधवारी सकाळी माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस सनी कांबळेचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून डोक्यात कुकरीचे सात ते आठ वर्मी घाव घालून खुनी हल्ला करण्यात आला होता. रात्री सातच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, हल्लेखोर असलेल्या अल्पवयीन मुलास कवठेमहांकाळ येथे पाठलाग करून पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य पाच संशय्तिांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

[amazon_link asins=’B016EOZ7OO,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2554da56-c8af-11e8-a06a-cd4397e48ea9′]
शुक्रवारी न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शकील पखाली यांनी जोरदार युक्तीवाद केला. हल्लेखोरांचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करायचे आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त करायच्या आहेत. संशयितांचे रक्ताचे नमुने अन्य हत्यारे जप्त करायची आहेत. जमीर रंगरेजबाबत चौकशी करून त्याला अटक करायची आहे. अहिल्यानगर येथील चौकात सनी कांबळेच्या खुनाचा कट शिजला आहे. यासाठी जमीर रंगरेजने बैठक बोलावली होती. त्याची व ठिकाणाची माहिती घ्यायची आहे असा युक्तीवाद अ‍ॅड. पखाली यांनी करत 14 दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्या. इंदलकर यांनी पाचही संशयितांना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान अल्पवयीन संशयिताकडे सखोल चौकशी केल्यानंतर तसेच त्याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी रंगरेजविरोधात खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्याची कुणकूण लागल्यानंतर दुपारी एकनंतर रंगरेजने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे. तो अद्यापही पसार असून त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवल्याचे पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07G5BTYC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a275bb2-c8af-11e8-b882-b1bbd4812e92′]
दरम्यान कुपवाडमधील एकाने राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज याच्यासह सनी कांबळे याच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या पाच संशयितांनी पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. अशी लेखी तक्रार एकाने दि. 29 सप्टेंबर रोजी केली होती. त्याशिवाय रंगरेजसह त्याच्या साथीदारांकडून जीवाला धोका असल्याचेही त्या तक्रार अर्जात म्हटले होते. याबाबत पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र त्यावर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यावेळीच रंगरेजसह त्याच्या साथीदारांवर कारवाई केली असती तर कदाचित सनी कांबळेचा खून झाला नसता अशी चर्चा आहे.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B074RMN99F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59c33f82-c8af-11e8-b03d-91a8d9688368′]