इंदापुरात एका रात्रीत सात दुकाने चोरट्यांनी फोडली

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   इंदापूर शहरातील अंबीकानगर येथे जुना पूणे सोलापूर हायवे रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या तळमजल्यातील पाच दुकाने व बँकेशेजारील एक माॅल व मंगेश पाटील पेट्रोल पंपासमोरील कृृृषि खताचे एक दुकान अशी सात दुकानांचे शटर उचकटुन चोरट्यांनी ८७ हजार ६१५ रूपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. तर एकाच रात्रीत तब्बल सात दुकानातील पैशांची व सामानाची चोरी झाल्याने इंदापूर शहरातील व्यापारीवर्ग व स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन चोरी करणारे चोरटे, चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असल्याने या चोरीचा तपास लवकरात लवकर लावुन आरोपींना बेड्या ठोकणार असल्याचे इंदापूर पोलीस निरिक्षक नारायण शिरगावकर यांनी सांगीतले.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत वामनराव पाटील यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली असून पाटील यांचे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांलगत इंदापूर – टेंभुर्णी नाक्यावरती मंगेश पाटील यांचे पेट्रोल पंपासमोर पार्वती गारमेंट्स अँड कंपनी या नावाचे कापड दुकान असून या दुकानाच्या खालील गाळ्यांमध्ये अतुल कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान आहे. २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यांत ठेवलेली वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे या दुकानातील पाच हजार रुपये किमतीची कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहेत.तर शेजारच्या अतुल कृषी सेवा केंद्राची घरफोडी यांनी केली असून या चोरट्यांनी कृषी औषधाचे 19 हजार रुपये किमतीचे पाच बॉक्स चोरून पलायन केले आहे.

त्यानंतर अंबीकानगर येथील देवीच्या देवळाच्या पाठीमागे असलेल्या बँक ऑफ इंडीया शाखेच्या शेजारीच असलेल्या अतुल गौतम झगडे यांच्या महालक्ष्मी बाजार या दुकानाचे शटर उचकटून त्यामधून ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याचदरम्यान बँक ऑफ इंडाया शाखेच्या खालच्या मजल्यातील सुहास भिवा राऊत यांच्या समर्थ मेडिकल औषध दुकानातून चोरट्यांनी ९८०० रुपयांचा रोख रक्कम चोरली.मंगेश पांडुरंग राऊत यांच्या राऊत ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला व चोरी करण्याचा प्रयत्न केला येथे तर त्यांना चोरी करता आले नाही. मात्र या दुकानाच्या शेजारीच गणेश निमसे यांच्या विमा कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्या शेजारी सागर शंकर तोरस्‍कर यांच्या संगणक दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील तिजोरीतील २२७५ रूपये चोरून नेले.असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

You might also like