Lockdown 3.0 : कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी मुलगी ‘लॉकडाऊन’मध्ये सायकलवर विकत होती भाजी, पोलिसांनी दिलं ‘हे’ गिफ्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी देशात मागील 40 दिवसांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन सुरु आहे. यावेळी पोलिस प्रशासन घरात बंद असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तू देत आहेत. आसाम पोलिस या संकटाच्या वेळी लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. दरम्यान, आसाम पोलिसांचे एक मन प्रसन्न करणारे चित्र समोर आले आहे. देशव्यापी लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची मदत करण्यासाठी सायकलवर भाजी विकणाऱ्या एका मुलीला पोलिसांनी दुचाकी वाहन भेट म्हणून दिले.
जनमोनी गोगोई यांच्या स्वाभिमानाने प्रेरित होऊन बाइक गिफ्ट केली
याबाबत माहिती देताना दिब्रुगड पोलिसांनी ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, ‘जनमोनी गोगोई नावाची मुलगी यावेळी घर सांभाळण्यासाठी सायकलवर भाजीपाला विकते. त्यामुळे तिच्या या स्वाभिमानाने आम्ही प्रेरित झालो आहोत. अर्थव्यवस्थेच्या सुविधांकरता पोलिस दलातून आपले रूपांतर करण्याच्या डीजीपी सरांच्या मार्गदर्शनातून डीवायएसपी मुख्यालयाने या छोट्याशा उद्योजकाला एक मोपेड बाईक भेट दिली आहे.
Janmoni Gogo sells vegetables on a bicylcle to fend for her family. Inspired by her self respect & guided by our visionary @DGPAssamPolice Sir's direction to transform ourselves from police force to facilitators of economy, DYSP HQ gifted the little entrepreneur a moped / bike pic.twitter.com/kncyhRQEr9
— Dibrugarh Police (@dibrugarhpolice) May 11, 2020
आजारी वडिलांना मदत करते जनमोनी
दिब्रुगड जिल्ह्यातील बोगीबील भागातील सप्तकती घोगोरा गावात राहणारी जनमोनी गोगोई आपल्या वृद्ध वडिलांसह कुटुंबाच्या देखभालीसाठी सायकलवर घरोघरी जाऊन भाजीपाला विकते. तिचे वडील गेल्या आठ वर्षांपासून आजारी आहेत. जनमोनीने दिब्रुगडमधील शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. इतरांप्रमाणेच तिचेही स्वप्न उच्च शिक्षण घेण्याचे होते.
परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या मदतीसाठी तिने भाजीपाला विक्री सुरू केली. त्यानंतर कुणीतरी तिचे छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर ते व्हायरल झाले. दरम्यान सोमवारी दिब्रुगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) पल्लवी मुजुमदार यांच्या नेतृत्वात जनमोनी गोगोई यांच्या घरी जाऊन तिला मोपेड बाईक गिफ्ट म्हणून दिली.