दौंड : आर.एस.एफ.च्या रक्कमेसाठी रयत संघटनेकडून आमरण उपोषण

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

अब्बास शेख

पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये असणाऱ्या तीन साखर कारखान्याकडून आर.एस.एफ (महसुली उत्पन्नाची रक्कम) दिली गेली नसल्याने रयत क्रांती संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालयासमोर बुधवार दि. २६/९/२०१८ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26224e4c-c18a-11e8-9d2d-7fa8476c02fc’]
यावेळी रयत क्रांती संघटनेचे भानुदास शिंदे आणि सर्फराज शेख यांनी या उपोषणाबाबत माहिती देताना २०१६-१७ ची देय असलेली आर.एस.एफ म्हणजेच महसुली उत्पन्नाच्या सूत्रानुसार निघणारी रक्कम ही दौंड तालुक्यातील दाैंड शुगर -१८ कोटी ५८ लाख १४ हजार, बारामती तालुक्यातील बारामती अॅग्रो – २० कोटी ९८ लाख ६४ हजार व शिरूर तालुक्यातील व्यंकटेशकृपा – १७ कोटी ८९ लाख ४२ हजार असे एकूण – ५७ कोटी ४५ लाख रुपये हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देने असून या साखर कारखान्यांनी सन २०१६-१७ ची देय असलेली वरील रक्कम हि मा.साखर आयुक्त पुणे यांनी दहा महिन्यांपूर्वी देण्याचे आदेश दिलेले असतानाही हि रक्कम अजूनही दिलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असे रयत क्रांती संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B00NFJGUPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e46325c-c18a-11e8-879a-835b6251290e’]

You might also like