परवेज मुशर्रफ यांच्याविरूध्द लढा उभारणार्‍या वकिलास बंधक बनवलं – अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना शिक्षा देण्यासाठी खटला लढलेल्या पाकिस्तानच्या एका वकीलाला सकाळी त्यांच्या घरी बंदी बनवण्यात आले. वकील अकरम शेख आणि त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या फॉर्म हाऊसवर 2 तासांसाठी बंदी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना धमकी देऊन बंदी बनवणारे लोक फरार झाले.

2 तास बंधक बनवले –
पाकिस्तानी मीडियाच्या मते ही घटना शनिवार सकाळची आहे. सांगण्यात आले की बंदूक दाखवून त्यांच्या कुटूंबीयांचे मोबाइल जप्त करण्यात आले त्यानंतर या सर्वांना एका खोलीत बंधक बनवण्यात आले. त्यानंतर घरातील सामान लुटण्यात आले. जाताना गुन्हेगारांनी वकीलाला धमकी दिली की न ऐकल्यास परत येऊ.

कोण आहे अकरम शेख –
अकरम शेख यांना त्या काळचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परवेज मुशर्रफ यांच्या विरोधात खटला लढण्यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त केले होते. ते 2018 पर्यंत या खटल्यावर लढत होते. इमरान खान सत्तेत आल्यावर त्यांना हटवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच एका विशेष न्यायालयाने संविधान बदलण्याच्या देशद्रोहाच्या आरोपाखाली मुशर्रफ यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ते पहिले सैन्य दलातील प्रमुख आहेत ज्यांना देशात आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

केस दाखल नाही –
या प्रकरणी अजूनतरी केस दाखल करण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडे वकील अकरम शेख यांनी अजून कोणतीही तक्रार नोंदवली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/