बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्या अन् दलित महिलेला मात्र जमिनीवर बसवलं

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतातील सामाजिक स्थितीचा सध्या उलटा प्रवास सुरू झाल्याचे चित्र वारंवार घडणार्‍या काही घटनांवरून दिसून येत आहे. नव भारतात माणूसकीसाठी लाजिरवाणी अशी घटना तामिळनाडूतील कुड्डलोर येथे घडली आहे. मन सुन्न करणार्‍या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील पंचायत अध्यक्षांच्या बैठकीत सर्वांना बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली तर एका दलित महिलेला खाली जमिनीवर बसवले होते.

कुड्डलोरमधील पंचायतीच्या कार्यालयात अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत सर्वांना बसायला खुर्च्यांची व्यवस्था होती. मात्र एका दलित महिलेला खाली जमिनीवर बसवले होते. या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या लज्जास्पद प्रकारावर सडकून टीका केली जात आहे. याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन पंचायत अध्यक्षाविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विेशेष म्हणजे अनेक खुर्चा रिकाम्या असताना मागासवर्गातील महिलेला बसण्यास जागा दिली गेली नाही. हिंदू धर्मातील जाती उतरंडीवरून पुन्हा एकदा माणूसकीला लाजिरवाण्या अशा घटना घडू लागल्याचे यावरून दिसून ओल आहे. यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अलिकडच्या काळात जातीभेद पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचे देशभरात घडणार्‍या विविध घटनांवरून दिसत आहे. त्यातच काही राजकीय नेतेसुद्धा बेधडकपणे जातीय विद्वेश पसरवणारी वक्तव्य करत असल्याने तथकथित उच्च वर्गाकडून खालच्या जातीतील माणसांना दुय्यम वागणूक देण्याचे प्रकार 21 व्या शतकारत समोर येऊ लागले आहेत. चेन्नईतील प्रकारानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तामिळनाडूतील या घटनेवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. समाजाची मानसिक दुषित झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. समाजातल्या जाणत्या लोकांनी अशा गोष्टी आचरणातून दाखवून देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.