सोमवारी मंदिर उघडणार,विठुरायाच्या दर्शनाची ओढ संपली, सरकारच्या निर्णयाचे पंढरीत फटाके फोडून स्वागत

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे पंढरीत फटाके फोडून स्वागत करण्यात ( pandharpur-everyone-welcomes-decision-to-open-temple) आले. येथील मंदिर परिसरातील व्यापारी, भक्त, महाराज मंडळीने पेढे, लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. 17 मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद केले होते. आता 16 नोव्हेंबरला म्हणजेच तब्बल 242 दिवसांनी मंदिर उघडणार असल्याने भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

करोनाचे संकटामुळे 17 मार्च रोजी राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. यात पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर देखील बंद ठेवले. त्यानंतर आलेल्या माघी आणि आषाढी वारीवर अनेक निर्बंध आले. लाखो भाविकांनी तसेच महाराज मंडळींनी सरकारच्या या निर्णयाचे पालन करीत वारकरी संप्रदायातील सहिष्णुतेचे दर्शन घडवले. आता कोरोनाचे संकट कमी होऊ लागताच मंदिरे खुली करा अशी मागणी जोर धरत होती.आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 16) मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची बातमी पंढरीत येताच एक आगळा वेगळा आनंदोत्सव साजरा झाला. या निर्णयाचे स्वागत करताना ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी सरकारचे आभार मानले. दरम्यान,राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना येतील त्या प्रमाणे भाविकांना दर्शन देवू असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. असे असले तरी आता भेटी लागे जीवा लागलीस आस या अभंगा प्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ आता भाविकांना लागली आहे.