फलटणमध्ये शॉक लागून 2 वारकर्‍यांचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

फलटणमध्ये पालखी स्थळावर 3 वारकर्‍यांना विजेचा धक्‍का लागला असून त्यामध्ये दोन वारकर्‍यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली आहे. दरम्यान, रविवारी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत कविता तोष्णीवाल यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ebe34e4a-88c4-11e8-b9d9-c79cbc3332f5′]
सोमवारी सकाळी पालखी पुढे निघाल्यानंतर ट्रक पंढरपूरच्या दिशेने जात असताना तिघांचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत माधवराव चोपडे (65) आणि जाईबाई महादू जामके (60) यांचा मृत्यू झाला आहे. चोपडे हे परभणी जिल्हयातील समतापूरचे रहिवाशी होते तर जाईबाई या नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील रहिवाशी होत्या. परभणी जिल्हयातील पूर्णा तालुक्यातील कमलाबाई गोविंद लोखंडे (65) या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत. अन्‍नदान करण्यासाठी गेलेल्या कविता तोष्णीवाल यांचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही दुर्देवी घटना घडली आहे. जखमी झालेल्या कमलाबाई लोखंडे यांच्यावर उपचार चालु असल्याची माहिती देण्यात आली आहे.