Pimpri : बंदुकीच्या धाकाने संगणक अभियंत्याला लुटले

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बंदुकीचा धाक दाखवून संगणक अभियंत्याच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेल्याचे घटना पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे घडली आहे. या प्रकरणी जसवंत कुमार अगरवाल (वय 42) यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.

जसवंत काल पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन परिसरात शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत दबा धरून उभा असलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली.

यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. पावसाळा आणि कोरोनाचे वातावरण असल्याने नागरिक रात्री नऊ वाजेनंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. त्यामुळे याचा गैरफायदा चोरटे उचलत असल्याचे दिसत आहे.