धुळ्याजवळ पोलिसांच्या वाहनाला अपघात, ३ जण जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला धुळे शहराजवळील कुंडाणे फाट्याजवळ अपघात झाला. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ही गाडी नंदुरबार येथून शिर्डी येथे निघाली होती. अपघातात ३ पोलीस अधिकारी जखमी झाले असून जखमी पोलीसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc3911bd-d1c3-11e8-adaf-e90e4ccd0923′]

शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. याच बदोबस्तासाठी नंदुरबार येथून शिर्डी येथे पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन हे वाहन निघाले होते. धुळे शहराजवळील कुंडाणे फाट्याजवळ हा अपघात घडला. पोलिसांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोरुन आलेल्या दुचाकी आणि पोलिसांचे वाहन यांच्यात हा अपघात झाला.

[amazon_link asins=’B0058RJ6D2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d41fecd5-d1c3-11e8-8091-6776cfe72c0c’]

अपघातात अनिल एन बहुरानी (४५, एपीआय, शहादा), चंद्रकांत मुरलीधर शिंदे (५७, पीएसआय, तळोदा) आणि रामलाल हिरालाल साठे (५७, पीएसआय, उपनगर नंदुरबार) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमी पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एका दिवसात स्वाइन फ्लूने घेतले ३ बळी

जाहिरात