प्रतिबंधक कारवाईत बीड पोलिसांचा मराठवाड्यात पहिला तर राज्यात चौथा नंबर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस महासंचालकांनी नुकतीच सहामाही आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सहामाही आढावा घेण्यात आला. सहामाही गुन्हे आढाव्यात गुन्ह्यांचा प्रतिबंध होण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये बीड पोलिसांनी मराठवाड्यात पहिला क्रमांक तर राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. बीड पोलिसांनी गुन्ह्यांचा प्रतिबंध होण्यासाठी सर्वात जास्त कारवाई केली आहे.

मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या सहामाही आढावा बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री अनील देशमुख तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील मागील सहा महिन्यांच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

विविध प्रतिबंधात्मक कारवायामध्ये बीड पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी चांगल्याप्रकारे हाताळला आहे. बीड पोलिसांनी सर्वाधिक सायबर गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये बीड पोलिसांचा मराठवाड्यात पहिला तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. बीड पोलिसांनी सायबर गुन्ह्यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून आणि इंटरनेटचा वापर करून गुन्हे उघडकीस आणले आहेत. मागील सहा महिन्यात गुन्ह्यांची उकल करून सर्वाधिक मुद्देमाल जप्त करण्यात बीड पोलीसांना यश आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –