धक्कादायक ! पुण्यात गेल्या 5 दिवसांत 10 जणांनी आत्महत्या करून संपवलं ‘जीवन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूने धुमाकुळ घालत असून कोरोनाचे धक्के बसत असतानाच गेल्या पाच दिवसांमध्ये दहा जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची माहिती पुढे येत आहेत. आर्थिक ओढाताण, कौटुंबिक वाद, नैराश्य आणि ड्रिप्रेशन अशामुळे आत्महत्येच्या घटना पुणे शहरामध्ये घडत आहेत. आज पहाटे केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केली. मुलाच्या आजारापणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

यापूर्वी देखील पुण्यात अशा प्रकारच्या घटनांनी खळबळ उडाली होती. पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. यामध्ये पत्नी आणि दोन मुलांची आर्थिक ओढाताणीमुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली.

औद्योगिक नगरी असलेल्या आणि पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन तरुणांनी आत्महत्या केली. कामावरून कमी केल्यामुळे त्यांना नैराश्य आले होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केली. तर पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती-पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले. वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत डुक्कर खिंडीतून उडी घेत महिलेने आत्महत्या केली. तिच्या पतीने आठ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दोन ते सहा या दरम्यान घडली. स्वप्निल रायकर असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. त्यांनी राहत्या घरात किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.