Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात 24 तासात 14 ‘कोरोना’बाधितांचा मृत्यू तर 291 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 241 बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं सर्वत्रच चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे शहरातील बाधितांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 14 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 291 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुण्यात कोरोनामुळं आतापर्यंत 241 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, आजच्या आकडेवारीवरून पुणेकरांची चिंता वाढली आहे.

दिवसभरात 189 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 3498 वर जाऊन पोहचली असून त्यामध्ये 1698 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. 168 क्रिटिकल रूग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी 49 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2371 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळं होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान शहरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आलेला आहे तरी देखील काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. पुणे शहर हे सध्या रेड झोनमध्ये आहे तर अनेक परिसर हे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू आणि 291 पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like