Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 6 जणांचा मृत्यू तर 271 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 271 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.


पुणे शहरात सध्या एकुण 2376 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आज आढळून आलेल्या 271 रूग्णांपौकी 221 नायडू, 20 ससून आणि 30 खासगी रूग्णालयातील आहेत. त्यांच्यापैकी 173 रूग्ण क्रिटिकल असून त्यापैकी 42 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या आठवडयाभरातील आज झालेल्या मृत्यूची संख्या ही सर्वात कमी आहे मात्र आढळणार्‍या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ही थोडी जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.