Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 8 जणांचा मृत्यू तर 294 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 294 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.


पुणे शहरात सध्या एकुण 2389 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आज आढळून आलेल्या 289 रूग्णांपौकी 222 नायडू, 17 ससून आणि 55 खासगी रूग्णालयातील आहेत. त्यांच्यापैकी 165 रूग्ण क्रिटिकल असून त्यापैकी 43 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. आतापर्यंत 4348 बाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 229 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. आतापर्यंत पुणे शहरात 352 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर आतापर्यंत पुणे शहरात एकूण 7089 ‘कोरोना’बाधित आढळले आहेत.